आ. डॉ. तांबे बनले शिक्षक

कोरोना विषयी साधला विद्यार्थ्यांशी संवाद संगमनेर : (प्रतिनिधी) 

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षाने सुरू झालेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट हा अत्यंत आनंददायी आहे .जळगाव जिल्ह्यातील चहार्डी गावात विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळेमध्ये नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कोरोना विषयी जागृती व विज्ञान विषय विषयाच्या प्रश्न विचारत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी शाळेमध्ये आमदार डॉ. तांबे यांनी भेट दिल्यानंतर थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला .

यावेळी अनेक दिवसांनी गजबजलेल्या शाळा पाहून आनंद व्यक्त करताना आमदार डॉ तांबे विद्यार्थ्यांना म्हणाले की, कोरोना संकटानंतर आपण सर्वजण एकत्र आलो आहोत .पर्यावरण संवर्धन व संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून निसर्गाच्या प्रकोपाने तुनहे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनीच खऱ्या अर्थाने आरोग्य व स्वच्छता दूत झाले पाहिजे. मित्र, शाळा हा किलबिलाट हा जीवनातील सर्वोच्च आनंद आहे .हा सातत्याने टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे .आपल्या घरातील प्रत्येकाला आरोग्य विषयाचे महत्त्व पटवून द्या. त्याचप्रमाणे ज्या राष्ट्र पुरुषांनी ,क्रांतिकारकांनी देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन हा देश स्वतंत्र केला त्यांच्या विचारातून काम करा .
विद्यार्थी जीवन हे अत्यंत निष्पाप व आनंददायी आहे. या जीवनाचा आनंद घ्या .चांगला अभ्यास करा. नवनवीन विषयांचे वाचन करा. दोन वर्षाच्या काळामध्ये प्रत्येकाने ऑनलाइन शिक्षण अनुभवले मात्र ऑनलाइन पेक्षा आता मैदानी खेळांना प्राधान्य द्या. आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे ऑनलाइन तंत्रातून जगातील नवनवीन संशोधन व अभ्यास प्रणालीतून नवीन माहिती मिळते.  त्यांचा आनंद आहे. मात्र व्हाट्सअप वर फेसबुकच्या मागे न पळता मैदानावर खेळत चला. हे सांगताना आपल्या शालेय जीवनातील अनेक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
 यावेळी त्यांच्या समवेत एडवोकेट संदीप पाटील ,तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, शिक्षक  संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. मंगेश भोईटे, नामदेव कहांडळ, प्राचार्य व्ही. आर .सोनवणे, पंकज पाटील, ए. पी. पाटील , महाजन सर आदी उपस्थित होते आमदार डॉ तांबे आणि साधलेल्या संवादामुळे विद्यार्थी आणि भारावून गेले . आमदार  जेव्हा शिक्षक बनतात तेव्हा विद्यार्थ्यांना हा एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या