घोडेगावं :
येथे २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बी डी काळे महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घोडेगाव या ठिकाणी निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकचा वापर बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना केले.
यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की, ग्राहक पंचायतीचे काम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त आहे.
सर्वसामान्य नागरिकांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये याची जाणीव नसते ग्राहकाची फसवणूक झाल्यावर कोणाकडे दाद मागता येईल असे ज्ञान नसते त्यांना याबाबत प्रबोधन करण्याची आवश्यकता असून असे काम ग्राहक पंचायत करते त्यांचे काम अतिशय मोलाचे आहे.
यावेळी बोलताना ग्राहक पंचायतिचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर म्हणाले कीग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे अनेक दुकानदार कंपन्या प्रलोभने देऊन एकावर एक फ्री च्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा माल विकण्याचा प्रयत्न करत असतात.
अशा जाहिरात करणाऱ्या कंपन्यांवर ती खात्री करूनच ग्राहकाने आपली खरेदी केली पाहिजे. ग्राहकांची त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रमाणकमी होईल यावेळी बि डी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजीत जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी तालुका अध्यक्ष सुभाष मावकर संघटनमंत्री देविदास काळे, दगडू लोखंडे ,सुदाम भालेराव ,अजित इंदोरे, वैभव वायाळ ,माजी सरपंच सुपे अनिकेत बांगर, संतोष बांगर कांताराम काळे, आशालता घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments