लस नसेल तर प्रवेश नाही, नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी नवीन नियमनाशिकः नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल. हे नवे नियम 23 तारखेपासून अंमलात येतील, अशी माहिती गुरुवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरजकुमार मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 31 डिसेंबरच्या पार्ट्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांची तपासणी करावी. त्यांचे लसीकरण झाले आहे का, हे पाहावे. फाईव्ह स्टार हॉटेल्स असतील किंवा कोणतेही हॉटेल असतील. परवानगी देताना अटींची पूर्तता होत नसेल, तर पोलिसांची कारवाई होईल. ज्यांना कार्यक्रम करायचे आहेत, त्यांनी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या