'पिनाक'चा लष्कर प्रवेश निश्चित
नवी दिल्ली :


पिनाक रॉकेट लाँचर हे स्वदेशी बनावटीचे रॉकेट लाँचर असून १९९८ नंतर लष्करात दाखल झाले आहे. ४४ सेकंदात ४० किलोमीटरपर्यंत मारा करु शकणारी १२ रॉकेट डागण्याची क्षमता ही सुरुवातीला पिनाकमधे होती. वेळोवेळी यामध्ये बदल करत याची गुणवत्ता, अचुकता यामधे बदल करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून अधिक दूरवर मारा करणाऱ्या नवे पिनाक हे विकसित करण्यात आलं आहे.


या नव्या पिनाकच्या सर्व चाचण्या समाधानकारक असून नवे पिनाक आता लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज झालं असल्याचं केंद्र सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे. या नव्या पिनाकमुळे लष्कराच्या मारक क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

नव्या पिनाक रॉकेट लाँचरमध्ये १२ रॉकेट्स हे ७० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर, जास्तीत जास्त ९० किलोमीटरपर्यंत मारा करु शकतात. नव्या पिनाकमध्ये रॉकेटची अचुकता आणि संहार करण्याची क्षमता ही वाढवण्यात आली आहे. 
तसेच गायडेड ( नियंत्रित ) रॉकेटही यामधून डागले जाऊ शकतात, म्हणतेच जमिनीवर आघात होतांना काहीशी दिशा बदलण्याची क्षमता या गायडेड रॉकेटमधे आहे. त्यामुळे नवे पिनाक रॉकेट लाँचर हे अधिक घातक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या