गाडगे महाराज शिक्षण संकुलात शालेय साहित्य वाटप


ओतूर,


येथील गाडगे महाराज शिक्षण संकुलात गुरीवारी(दि.१६) कन्या छात्रालयातील विद्यार्थीनींना ड्रेस व शालेय साहित्य वितरण समारंभ घेण्यात आला असल्याचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नितीन पाटील यांनी सांगितले.
दानशूर व्यक्तिमत्व ह.भ.प.अनंतराव गवांदे बाबा यांनी कन्या छात्रालयातील मुलींना गणवेश व शालेय साहीत्य वाटप केले यावेळी त्यांच्या समवेत सी.ए.राम गवांदे,इंजि.ईश्वर गवांदे,संतोष तांबे उपस्थित होते.
ह.भ.प.अनंतराव गवांदे बाबांचे व वै.दलितमित्र प्र.मा.पाटील साहेब यांचे जुने ऋणानुबंध असल्याने बाबांनी ते जपून ठेवले.विद्यालयातील विद्यार्थीनींना ड्रेस वितरण करून गवांदे कुटुंब आज खऱ्या अर्थांने बाबांचे विचारांवर मार्गक्रमण करत असल्याचे नितीन पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
गाडगे बाबा बोलायचे "तीर्थी धोंडा पाणी।देव रोकडा सज्जनी"
खरा देव तर तुमच्या समोर नारायणाच्या रुपात आहे.त्यांना मदत करा.ह.भ.प.गवांदे बाबा हे जुन्या पिढीतील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.
दानशुर गवांदे कुटुंबियांच्या या कार्यामुळे कन्या छात्रालयातील मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या पुढील काळातही हे दातृत्वाचे कार्य या शिक्षण संकुलणासाठी अविरत सुरू राहणार असल्याचे यावेळी बोलताना बाबांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी ओतूर शाखेचे नितीन पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज कोटकर,पर्यवेक्षक कैलास महाजन,शिक्षक प्रतिनिधी अशोकराव सोनोने,जेष्ठ शिक्षक,सुनील पोकळे,प्रदीप मिरगे, रामदास बगाड तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत मोरे यांनी केले तर सुत्रसंचलन रवींद्र अहीनवे यांनी केले व आभार शोभा तांबे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता बाबांच्या पसायदानाने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या