स्पर्धा परीक्षांची पायाभरणी मराठी शाळांमध्येच

 स्पर्धा परीक्षांची पायाभरणी मराठी शाळांमध्येच : विवेक वळसे 


लोणी धामणी : 

प्रतिनिधी


 लोकसेवा, राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादित करण्यात जिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळांचा मोलाचा वाटा असल्याचे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले. खडकवाडी गावचे सुपुत्र कु.संकेत दत्तात्रय पोखरकर याने एन डी ए स्पर्धा परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश संपादन करुन सब लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल आज खडकवाडी ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद शाळा खडकवाडी यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळयात बोलत होते. केरळ येथील इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये पुढील चार वर्षे प्रशिक्षण होणार आहे.  

यावेळी पं.स. सदस्य रवींद्र करंजखेले, आंबेगाव तालुका शेतमाल संघ अध्यक्ष भगवानराव सिनलकर, श्रीनाथ पतसंस्था अध्यक्ष उदय डोके, मा.चेअरमन बाळासाहेब वाळुंज, महेंद्रशेठ वाळुंज, सरपंच कमल सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे, अनिल डोके, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष सुक्रे, वाळुंजनगर सरपंच विजय सिनलकर, सुरेश सुक्रे, ग्रा.प सदस्य गुरुदेव पोखरकर, गोरख पोखरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाळुंज, मयूर सुक्रे, प्रवीण रणदिवे, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

आजवरच्या यशाबद्दल आई वडील, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे खूप सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले. या सर्वांना आभार व्यक्त करत पालकांनी आपल्या पाल्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी पाठींबा दिला पाहिजे, असे संकेत पोखरकर याने सत्कारार्थी उत्तर दिलेल्या भाषणात सांगितले. यावेळी संकेत यांना घडविलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या