दुग्ध व्यवसाय कार्यशाळचे आयोजन*

तळेगाव ढमढेरे


:

निमगाव म्हाळुंगी येथे ग्रामपंचायत आणि हरिता कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
     निमगाव म्हाळुंगी(ता.शिरूर) येथील सैनिक भवन मध्ये हि कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये डॉ. महेश पारखे यांनी शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय फायद्याचा आहे कि तोट्याचा आहे, जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे असावे, गोठा व्यवस्थापन, कालवड संगोपन, जनावरांचे आजार व संगोपन तसेच गोचीड निर्मूलन इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच महेंद्र रणसिंग, उपसरपंच तनुजा विधाटे, कविता चौधरी, ग्रा.पं.सदस्य बापूसाहेब काळे, राजेंद्र विधाटे, संतोष करपे, बाबासाहेब रणसिंग, दादासाहेब रणसिंग, दादाभाऊ काळे, काळुराम चव्हाण, काकासाहेब करपे, हरिता कंपनीचे व्यवस्थापक अनिकेत अडसूळ, वंदना थोपटे, अमोल नाणेकर,डॉ. राजेंद्र टेमगिरे, दिलीप वाबळे, दत्तात्रय शिवले व इतर शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यांनी केले तर प्रास्ताविक हरिता कंपनीचे व्यवस्थापक अनिकेत अडसूळ यांनी केले आणि राजेंद्र विधाटे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या