पारनेर नगरपंचायत निवडणुकी मधुन २१ उमेदवारांची माघार,४२ उमेदवार रिंगणात..

 शिवसेना,राष्ट्रवादी व शहर विकास आघाडीमधे तिरंगी लढत होणार...


राष्ट्रीय पक्ष असणार्‍या काँग्रेसचा १ व भाजपाचा १ उमेदवार..


प्रभाग क्र.५ व प्रभाग क्र.९ मधे एकास एक सरळ लढत होणार...


पारनेर : (दत्ता गाडगे)


पारनेर नगर पंचायतसाठी २१ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असुन,सोमवार.दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. त्यानुसार निवडणुकीमधील ६३ उमेदवारांपैकी २१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुक रिंगणामधुन  आपली माघार घेतली आहे.आता निवडणुक रिंगणामधे आता १३ जागांसाठी ४२ उमेदवारांचे अर्ज राहीले आहेत.या निवडणुकीमधे ४२ उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत.दि.१४ डिसेंबरला उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार आहे अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डाॅ.सुनिता कुमावत यांनी हि माहीती दिली. निवडणुक तिरंगी होणार हे आता स्पष्ट झाले असुन,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व शहर विकास आघाडीमधे हि लढत होणार आहे.राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा १ उमेदवार तर,भारतीय जनता पार्टीचा १ असे उमेदवार उभे आहेत.

      

माघारीनंतर माध्यमांशी बोलताना निवडणुक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले म्हणाले,पारनेर नगरपंचायत निवडणुकी साठी आज सोमवार दि.१३ डिसेंबरला दु.३ वाजेपर्यंत ६३ उमेदवारांपैकी २१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असुन,आता निवडणुक लढवणार्‍या उमेदवारांची एकुण संख्या ४२ अशी झालेली आहे.त्यामधे प्रभाग क्र २,११,१३,१४ हे प्रभाग वगळुन उर्वरीत १३ प्रभागां मधे हि निवडणुक होणार आहे. त्यासाठी ४२ उमेदवार निवडणुक लढवित असुन,उद्या मंगळवार दि.१४ डिसेंबरला सकाळी १० वाजता चिन्हवाटपाचा कार्यक्रम निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामधे होणार असल्याचे सांगीतले.प्रभाग क्र.५ व प्रभाग क्र.९ मधे एकास एक अशी सरळ लढत होणार आहे.अर्ज माघार प्रक्रियेनंतर निवडणुक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिलेली प्रतिक्रिया..


प्रभागनिहाय लढत देणारे उमेदवार खालीललप्रमाणे :

प्रभाग १

शितल सुनिल म्हस्के (शहर विकास आघाडी), प्रियंका अंकुश सोबले (अपक्ष), शालूबाई कांतीलाल ठाणगे (शिवसेना), वैशाली आनंदा औटी (राष्ट्रवादी)

प्रभाग ३

अजित बाळासाहेब देशमाने (शहर विकास आघाडी), नितिन अण्णा औटी (शिवसेना), योगेश अशोक मते (अपक्ष), दगडू बाबाजी शेरकर (राष्ट्रवादी)

प्रभाग ४

गणेश विठ्ठल वैद्य (शहर विकास आघाडी), नवनाथ तुकाराम सोबले (शिवसेना), विजेता विलास सोबले (राष्ट्रवादी)

प्रभाग ५

चंद्रकांत रघुनाथ चेडे (शहर विकास आघाडी) नितीन रमेश अडसुळ (अपक्ष)

प्रभाग ६

आशा चंद्रकांत चेडे (शहर विकास आघाडी), रोहिणी संदीप औटी (शिवसेना), निता विजय औटी (राष्ट्रवादी)

प्रभाग ७

मालन बापू शिंदे (शहर विकास आघाडी), जमुना रोहिदास परदेशी (अपक्ष), विद्या अनिल गंधाडे (शिवसेना), उषा नामदेव खोसे (राष्ट्रवादी), वर्षा सचिन जाधव (अपक्ष), अनिता भालचंद्र डेंगळ (इंडियन नॅशनल काँग्रेस)

प्रभाग ८

भुषण उत्तम शेलार ( शहर विकास आघाडी), संतोष सुरेश लोहकरे (शिवसेना), अश्विनी बाळू सोनवणे (राष्ट्रवादी)

प्रभाग ९

जयश्री विजयराव औटी (शिवसेना), हिमानी रामजी नगरे (राष्ट्रवादी)

प्रभाग १०

सुरेखा अर्जुन भालेकर (शहर विकास आघाडी),इंतियाज सलिम राजे (शिवसेना), सुरेखा राजेश चेडे(राष्ट्रवादी)

प्रभाग १२

डॉ. विद्या बाळासाहेब कावरे (राष्ट्रवादी), रेणूका संजय रूईकर (शिवसेना), सुनंदा दत्तात्रय शेरकर(भाजपा),

प्रभाग १५

सविता राजेंद्र ठुबे (शहर विकास आघाडी), जायदा राजू शेख (शिवसेना), अंजुम अकिल शेख (राष्ट्रवादी)

प्रभाग १६

रविंद्र बाबाजी खेडेकर (अपक्ष), युवराज कुंडलीक पठारे (शिवसेना), महेश राजाराम औटी (राष्ट्रवादी)

प्रभाग १७

अनिता संदीप मोढवे (शिवसेना), ममता सुभाष औटी (शहर विकास आघाडी), प्रियंका सचिन औटी(राष्ट्रवादी)


निवडणुकीमधुन माघार घेतलेल्या प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -

प्रभाग क्र.१ 

विजया बाळू औटी, 

उषा बापू सोबले

प्रभाग क्र.३

 गाडगे सुनिल अरुण

प्रभाग क्र.४

 विवेक सावकार शेरकर

प्रभाग क्र.५

 चेडे रुषीकेश चंद्रकांत

प्रभाग क्र.६

 चेडे शकुंतला रघुनाथ

प्रभाग क्र.७

 प्रियंका विजय परदेशी

प्रभाग क्र.८ 

लोहकरे निलेश किसन

प्रभाग क्र. ९

 वर्षा शंकर नगरे

अमित हरीभाऊ जाधव

श्रीमंदिलकर वैभव सुर्यकांत

सचिन तुकाराम नगरे

जेऊरकर स्वरुप सतिश

मते विलास तुकाराम

नगरे शरद मधुकर

प्रभाग क्र. १०

 गाडगे स्वाती सुनिल

प्रभाग क्र. १५ 

सुलताना शकील शेख


प्रभाग क्र. १६ 

पठारे मनिषा युवराज

पठारे यशवंत कुंडलीक

भिसे संतोष कारभारी


प्रभाग क्र. १७

 औटी सुवर्णा रामदास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या