महालोक अदालतीत सहा खटले निकाली...

 'आयसीआयसीआय' कडून सव्वा कोटींची भरपाई..  बारामती (दि:१३)

बारामती येथील महालोक अदालतमध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे मोटार वाहन अपघातांच्या एकूण सहा खटल्यांमध्ये तडजोड करून दिव्यांग आणि मृतांच्या वारसांना एकूण १ कोटी २२ लाख ५७ हजार रुपयांची नुकसान भरपाई  मिळवून देण्यात आली. दरम्यान, वैशाली गदादे  अर्जदार असलेल्या या एकाच अपघात प्रकरणात तब्बल ८५ लाख नुकसान भरपाई संबंधित  वारसांना आयसीआयसीआय कंपनीने दिली असल्याची माहिती विमा कंपनीचे कायदा सल्लागार व  बारामतीतील सुप्रसिद्ध वकील विशाल बर्गे यांनी दिली.


अनेकदा  न्यायालयीन खटल्यांमध्ये  अंतिम निकाल लागेपर्यंत बराच कालावधी जातो.  जेव्हा नुकसानभरपाई रक्कम मिळते तेव्हा खूप  विलंब झालेला असतो. त्यामुळे पीडित अर्जदाराला  उशिरा पैसे मिळतात. त्यावेळी त्या पैशांचा विशेष फायदा होत नाही. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापक  दिपेश कोटेवर व  अजित गोवारी यांनी या नुकसानभरपाई बाबत ठोस निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी अपघाताच्या खटल्यांमध्ये जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली. 

 आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचीएकूण सहा न्यायप्रविष्ट प्रकरणे बारामती न्यायालयातील  महा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. यामध्ये तडजोड होऊन एकूण १ कोटी २२ लाख ५७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.  या वर्षांतील पुणे जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एकमेव घटना असावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या