निधी खर्च करू शकत नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसवा - आ. काळेकोपरगाव :

२०१६ ला कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले. हे सातही नगरसेवक निवडून आल्यापासून नेहमीच विकासाच्या बाजूने उभे राहून त्यांनी आजवर विकासाला साथ दिली आहे. परंतु शहरातील नागरिकांनी ज्यांना ज्या विश्वासाने कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत देवून सत्ताधारी बनवले. त्यांनी शहरविकासाला विरोध करून नागरिकांचा विश्वासघात केला आहे. अशा विकासाला विरोध करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवा व विकासाची आस असणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

 वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये ६० लक्ष ०३ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या आचारी हॉस्पिटल ते छत्रपती श्री. संभाजी महाराज सर्कलपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजनप्र.क्र. ९ मध्ये ४८ लक्ष ८३ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या छत्रपती श्री. संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंपापर्यंत) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे व १७ लक्ष ३६ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव रोड ते बापु वढणे घर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे व पुढील काळात देखील जेवढा जास्त निधी आणता येईल तेवढा निधी आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरु राहतील. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी विकासाला साथ दिली परंतु मागील सहा महिन्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी शहरविकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांना परवानगी दिली असतांना देखील न्यायालयात जावून विकासकामांना स्थगिती मिळवून शहरवासियांना विकासापासून वंचित ठेवले आहे. नागरिकांना खड्ड्यातून जावे लागलेधुळीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जनतेचा वाढत असलेला रोष पाहून सत्ताधाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचले मात्र सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे जनतेचे हाल झाले. विकासासाठी आलेला निधी खर्च करू शकत नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसवा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देवून सत्ता द्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.

यावेळी गटनेते नगरसेवक विरेन बोरावकेमंदार पहाडेप्रतिभा शिलेदारवर्षा कहारअजीज शेखहाजी मेहमूद सय्यदराजेंद्र वाकचौरेडॉ. अजय गर्जेसंदीप रोहमारेकृष्णा आढावडॉ. तुषार गलांडेबाळासाहेब रुईकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या