साखर निर्यातीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवरपुणे : ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे साखऱ कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरु असून उत्पादनाबरोबरच  साखरेच्या निर्यातीमध्येमहाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. पोषक वातावरणामुळे उतारही चांगला पडत असून देशातील निर्यातीच्या जवळपास 70 टक्के निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. शिवाय भविष्यातही साखरेचे दर वाढतीव या अपेक्षेने साखर कारखानदार हे निर्यातीचा करार न करता कच्च्या साखरेच्या साठवणूकीवर भर देत आहे. देशांतर्गत साखरेचे वाढते उत्पादन आणि जागतिक पातळीवर होत असलेली मागणी यामुळे साखर उत्पादकांना अच्छे दिन येणार असेच चित्र आहे.

राज्यात 15 ऑक्टोंबरपासून गाळप हंगामाला सुरवात झाली होती. हंगामाच्या सुरवातीला साखर आयुक्त यांची परवानगी नसल्याने काही कारखाने हे सुरुच झाले नव्हते. पण आता 182 साखर कारखाने हे सुरु झाले आहेत. यामध्ये 91 सहकारी तर 91 हे खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. साखरेच्या उताऱ्यावर उत्पादन हे अवलंबून असते. राज्यात सर्वाधिक म्हणजे 10 टक्के उतार हा कोल्हापूर विभागात आहे. तर संपूर्ण राज्याचा उतारा हा 9.21 टक्के आहे. आतापर्यंत या साखऱ कारखान्यांच्या माध्यमातून 272 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. तर त्याबदल्यात 252 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हे झालेले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या