शिवसेनेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही – नितेश राणे
शिवसेना आणि नितेश राणे यांच्यामधील वाद हा काही नवा नाहीये. नितेश राणे यांचे एक ट्विट पुन्हा एकदा वादाचे कारण झाले आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असे ट्विट केल्यावरुन शिवसैनिकांनी नितेश राणेंविरोधात पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे

काळाचौकी आणि भायखळा पोलिस स्टेशनमध्ये नितेश राणेंविरोधात तक्रारीचे पत्र शिवसैनिकांनी दिले आहे. तर भायखळा शिवडी, काळाचौकी वरळी येथे नितेश राणे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी सेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही तक्रार दिली आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. असे चूकीचे ट्विट केल्यावरुन तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असे ट्विट केल्यावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या