डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यामुंबईः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त 6 डिसेंबरला दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरिता 8 उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

कोणत्या विशेष रेल्वेंची सुविधा?

– मेन लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल.

– कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल.

– मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल.

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल.

– हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल.

– पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.

– हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल.

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे चार वाजता पोहोचेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या