Breaking News

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण सोहळ्याचे पेढे वाटून स्वागतआळंदी : 
काशी विश्वनाथ धामचे आज लोकार्पन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले या अभुतपूर्व लोकार्पन सोहळ्याचे आळंदी शहर भाजप आणि आध्यात्मिक विकास आघाडीच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी येथील महाद्वार चौकात थेट प्रक्षेपण करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व भाविकांना पेढे वाटून स्वागत करण्यात आले.यावेळी आळंदी क्षेत्रातील हभप महाराज मंडळी, बृम्हवृंदाचा सन्मान करण्यात आला. 
या वेळी हभप मारुती महाराज कु-हेकर,हभप डाॅ.नारायण महाराज जाधव,पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे,आध्यात्मिक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड,भाजप तालुकाध्यक्ष शांताराम गायकवाड,शहराध्यक्ष किरण येळवंडे आदी उपस्थित होते.
हभप मारुती महाराज कु-हेकर व हभप डाॅ.नारायण महाराज जाधव यांनी काशी विश्वनाथ धामचे लोकार्पन सोहळ्यानिमित्ताने उपस्थित भाविकांना आशिर्वाद दिले,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गरूड यांनी केले,आरती आणि माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Attachments area

Post a Comment

0 Comments