शिवसेना म्हणजे डबल ढोलकी : आ. पाटील


पुणे:

दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट झाली या भेटीमुळे राज्यात  शिवसेना यूपी मधल्या घटक पक्षा बरोबर निवडणुका लढणार अशी चर्चा राज्यात सुरू झाली. त्यावर शिवसेना डबल ढोलकी करत आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांना भेटतात अन तिकडे यूपीए बैठकीला जातात आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

आज भाजपची महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची बैठक चिंतन पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही टिका केली.

शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक बाबरी मशीदचे पोस्ट टाकली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, नार्वेकर यांनी बोलणं किंवा ट्विट करणं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या पायाला सुरुंग लावणे असे आहे. 

भाजप मधले काही पदाधिकारी व नगरसेवक नाराज आहेत. अशी चर्चा सुरू आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,कुठंही नगरसेवक पदाधिकारी नाराज नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या