चुकीच्या वीज बिलाविरोधात लढा उभारू

इरिगेशन फेडरेशनचा इशारा 



दौंड  :
शेतकऱ्यांना दिलेली बोगस वीज बिले दुरुस्त करावीत अन्यथा तीव्र लढा उभा करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन तर्फे करण्यात आला.
मोर्चासमोर आमदार अरुण लाड म्हणाले, कार्यालयात बसून खोटी चुकीची वीज बिले दिली आहेत. ती दुरुस्त करून दिली पाहिजेत. यापुढील काळात थकीत बिलापोटी कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, बिल भरण्यास मुदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील वीज वितरण कार्यालयावर सोमवारी निघालेल्या मोर्चात आमदार अरुण लाडू, संजय घाटगे, प्रताप होगाडे, जे. पी. लाड, विक्रांत पाटील-किणीकर, आदी नेत्यांनी भविष्यात महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला.
दरम्यान, मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्य अभियंता परेश भागवत यांनी उच्च व लघु दाबाच्या उपसा सिंचन योजनेतील कृषीपंपाचे वीज बिल पूर्वीप्रमाणे १ रुपये पैशांनी आकारले जाईल, चुकीची वीज बिले दुरुस्त करून दिली जातील, असे आश्वासन  दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

       यावेळी एम.जी. शेलार अशोक जाधव, विनायक शिंदे, सिकंदर मुल्ला यांची भाषणे झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या