काकांच्या जीवनातच सहकार ते सहकार जगतात : अनास्कर

राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षांची समतास सदिच्छा भेट



कोपरगाव : तालुका प्रतिनिधी 


 सहकारातून समृध्दीकडे या प्रमाणे काकांच्या जीवनातच सहकार असून ते सहकार जगतात त्यांचे जीवन समृध्द आहे आणि यातून त्यांना मानसिक समाधान ही मिळते. या समृद्ध जीवन जगण्याच्या कलेतून समता पतसंस्थेला पण आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविले असून समताच्या नावातच समानता असल्यामुळे ग्राहकांना पत निर्माण करून देणारी पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केली असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभासदग्राहकांना आदर्शवत सेवा देत समताच्या ठेवीदारांच्या ठेवी समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड हे समताचे एक अभेद्य सुरक्षा कवच आहे. यामुळे समताच्या ९९.०९℅ ठेवी सुरक्षित असून महाराष्ट्रातील अग्रगण्य बँका आणि पतसंस्थापैकी समताची ठेवी सुरक्षिततेबाबत विक्रमी वाढ आहेअसे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी काढले.

 

समता नागरी सहकारी पतसंस्थेस १८ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सहकार परिषद,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक,महाराष्ट्र अर्बन बॅंक्स फेडरेशन चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सदिच्छा भेट दिलीस्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात त्यांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आलाप्रसंगी ते बोलत होतेसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंडा विषयी सविस्तर माहिती दिली

 

विद्याधर अनास्करपुढे म्हणाले कीकितीही  मोठे व्हा पण बँका बनू नका तर ज्यांना पत नाही त्यांना कर्ज देऊन पत निर्माण करून देणाऱ्या पतसंस्था बना. कारण आज पतसंस्थानीच सामान्य  गरजू नागरिकांना कर्ज देऊन आर्थिक स्थिरता प्राप्त करून दिली आहे.समताने देखील नावलौकिक मिळविला असून धनादेश पुस्तक (चेक बुकची सुविधा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला तर समताच्या प्रगतीत अजून एक नवीन पाऊल पडेल.

 

प्रारंभी विद्याधर अनास्कर यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालयाला भेट देऊन पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेतली. तत्पर सेवा आणि सहकार उद्योग मंदिरातील गृहउद्योगांची माहिती जाणून घेत कौतुक करत शुभेच्छा दिल्या

 

अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे,


ठोळे उद्योग समुहाचे संस्थापक कैलास ठोळेश्याम क्षीरसागररामचंद्र बागरेचाअरविंद पटेलजितुभाई शहाकचरू मोकळगुलशन होडेसंदीप कोयटेकिरण शिरोडेजनरल मॅनेजर सचिन भट्टडमुख्य कार्यालयाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार संचालक  संदीप कोयटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या