आळंदीचा तबलावादक निखील ताकभाते 'युवा कला गौरव' पुरस्काराने सन्मानित

 


आळंदी : 

राज्यस्तरीय 'युवा कला गौरव पुरस्कार' श्री क्षेत्र आळंदी येथील निष्ठावंत वारकरी तबलावादक हभप निखिल ताकभाते यांना जाहीर झाला. संगीत कला विभागात आर्ट बिट्स फाउंडेशनकडून हा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आला आहे. मेडल व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

आर्ट बिट्स पुणे या संस्थेचे संस्थापक संतोष पांचाळ म्हणाले आर्ट बिट्स ही संस्था गेली वीस वर्ष सातत्याने चित्र, शिल्प,संगीत,अभिनय,नृत्य आणि लोककला या विभागातील कला व कलाकारांना सक्षम व्यासपीठ आणि प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. दरवर्षी विविध पुरस्कार जाहीर करण्यात येतात, यावर्षी संगीत कला या विभागात हा पुरस्कार आळंदी येथील वारकरी निखिल ताकभाते यांना जाहीर झाला आहे,निखिल ताकभाते हे प्रतिभावंत युवा तबलावादक कलाकार आहेत, सुप्रसिद्ध तबला वादक पंडित आदित्य कल्याणकर आणि गणेश टाके यांचे ते शिष्य आहेत.

 निखिल यांनी आत्तापर्यंत अनेक शास्त्रीय,उपशास्त्रीय संगीत तसेच वारकरी‌ संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्र व इतर राज्यात देखील अनेक दिग्गज कलाकारांना साथसंगत केली आहे आणि या व्यतिरिक्त त्यांना अनेक मानाचे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या