शालेय मुलांना शिरूरकरांची मायेची उब


रांजणगाव गणपती:- 

पिंपरी दुमाला (ता. शिरुर) शाळेचे मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक राहुल चातूर यांनी गेल्या सहा वर्षापासून दुर्गम भागातील मुलांना "मायेची उब" हा उपक्रम सुरु केला असून त्यांनी नुकतेच आंबेगाव तालुक्यातील माळीण, अडीवरे, पंचाळे, पसारवाडी तसेच खेड तालुक्यातील धामणमाळ व ठाकरवाडी तसेच वेल्हे तालुक्यातील कोंढावळे खुर्द या गावांमध्ये जात येथील तब्बल १६४ शालेय विद्यार्थ्यांना ऊबदार रजई, सोलापुरी चादर व कानटोपीचे वाटप केले आहे.

राहुल चातूर यांनी सुरु केलेल्या उपक्रमात अनेक शिक्षक व आदींनी सहभाग घेत आंबेगाव व खेड तालुक्यातील दुर्गम भागातील सहा शाळांमध्ये १६४ विद्यार्थ्यांना ऊबदार कपड्यांचे वाटप केल्याने आंबेगाव व खेडच्या शालेय मुलांना शिरूरकरांची मायेची उब मिळाली आहे.

यावेळी गणेगाव खालसाचे उपसरपंच आबासाहेब बांगर, उद्योजक संभाजी बांगर, संदीप भोगावडे, अमोल बांगर, मुख्याध्यापक गणेश सांडभोर, शाळा समिती अध्यक्ष वैशाली सरपाले, अंकुश खोपडे, आशा खोपडे, अविनाश वैद्य यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये ३०० विद्यार्थ्यांना मायेची ऊब देण्याचा संकल्प असल्याचे राहुल चातुर व कल्याण कोकाटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या