विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत

शेतकरी ते ग्राहक द्राक्ष विक्रीचा शुभारंभ 


इंदापूर : 


महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महात्मा फुले कृषि विज्ञान केंद्र व इंदापूर तालुका शेतकरी उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्ष विक्रीचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) मौजे सरडेवाडी ता.इंदापूर या ठिकाणी संपन्न झाला.

प्रसंगी पुणे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार,राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.रामहरी सोमकुंवर,बारामती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे,तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपणवर यांनी द्राक्ष शेती बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी संशोधन केंद्राचे महत्त्व बागायतदारांना विशद केले व संशोधन केंद्रावर चाललेल्या संशोधनाचा लाभ घेण्याचेही त्यांनी सांगितले.शेतकरी उत्पादक संघाला द्राक्षापासून बनविण्यात येत असलेल्या विविध पदार्थांबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करण्याची तयारी त्यांनी दाखविली. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी द्राक्ष निर्याती बरोबरच द्राक्षाचे मूल्यवर्धित उत्पादन शेतकरी उत्पादक संघामार्फत ग्राहका पर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले.

यावेळी चंद्रकांत साळुंखे-माळी, सतीश शिंदे, अक्षय माळी, नंदू घाडगे-माळी,संतोष जाधव,उमेश घोगरे, नाना ताटे, बापुराव मदने, गणेश पांढरे, विष्णु हरणावळ, अतुल मोरे,सागर हरणावळ, अक्षय हरणावळ तसेच तालुक्यातील द्राक्ष बागायतदार,कृषी विभागातील अधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र वाघमोडे,सुधीर वाघमोडे यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या