जलसंपदामुळे तीन लाख नागरिकांना पाणी टंचाई

 

जलसंपदामुळे तीन लाख नागरिक करतात पाणी टंचाईचा सामना
- महापालिकेस एनओसी देण्यास 2 वर्षांपासून नकार

पुणे : प्रतिनिधी

हडपसर, माळवाडी, साडेसतरा नळी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी बेबी कालव्याच्या बाजूने पाई

पलाईन टाकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास जलसंपदा विभाग गेली दोन वर्षे टाळाटाळ करत आहे. जलसंपदाच्या आडमुठेपणामुळे तीन लाख नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेकडून समान पाणी योजने अंतर्गत शहरात नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहे. हडपसर- माळवाडी, साडेसतरा नळी परिसराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी समान पाणी योजने अंतर्गत हडपसर भागात सहा पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. या टाक्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेस सुमारे तीन किलोमीटर जलवाहिन्या बेबी कालव्याच्या बाजूने टाकायची आहे. 

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून एनओसी देण्यास टाळाटाळ करत आहे. एनओसी मिळण्यासाठी पालिका वारंवार जलसंपदा शी पत्रव्यवहार करत आहे. मात्र पालिकेच्या पत्रांना केराची टोपली दाखविली जात असल्याने महापालिका हतबल झाली आहे.

दरम्यान, महापालिका सध्या या भागात जुन्या जलवाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा करत आहे. 
मात्र, या भागातील वाढलेल्या नागरिकरणास पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. या नवीन टाक्यांमुळे या भागाची पाणी समस्याच सुटणार आहे. मात्र, जलसंपदाने आडमुठी भूमिका घेतल्याने तीन लाख नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या