शनिदेवाचे दर्शनाने बालगोपाळ आनंदवले...टाकळीभान :

श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर व वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले शनि देवगाव येथे आज (ता.४) शनि अमावस्या निमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांसह बालगोपाळांनी शनीदेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.

सालाबादप्रमाणे श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने शनिदेवाचा उत्सव साजरा करीत असतात. सकाळी श्रींच्या मुर्तीस अभ्यंगस्नान, विधिवत पूजन, महाआरती तसेच दुपारी कारेगाव व पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम करण्यात आला व सायंकाळी संदीपान महाराज शिवगिरी आश्रम (बाजाठाण) यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विश्वनाथ मेघळे (शनिदेवगाव) यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या