Breaking News

केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डॉ.कराड यांची डॉ.हेडगेवार पतसंस्थेला भेट


नेवासा (प्रतिनिधी)

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ. भागवतराव कराड यांनी नेवासा येथील डॉ.हेडगेवार पतसंस्थेला नुकतीच भेट दिली.ठेवीत वाढ करून योग्य खातेदारांना कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी अपेक्षा ना.डॉ.भागवतराव कराड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
       यावेळी ना. डॉ.भागवतराव कराड यांनी दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष सुरेश नळकांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून सन्मान केला. डॉ.हेडगेवार पतसंस्थेची चाललेली वाटचाल,असलेल्या एकूण ठेवी,एकूण सभासद त्यापैकी गरजूंना एकुण केलेले कर्ज वाटप या विषयी माहिती देऊन अहवाल ही अध्यक्ष सुरेश नळकांडे यांनी सादर केला
    यावेळी बोलताना केंद्रीय अर्थराज्य मंत्री नामदार डॉ.भागवतराव कराड म्हणाले की डॉ.हेडगेवार पतसंस्थेने डॉ.हेडगेवार यांच्या नावाला साजेशे असेच कार्य केले आहे असे सांगत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
       यावेळी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा मीना परदेशी, नेवासा नगरपंचायतचे इंजिनियर नगरसेवक सुनीलराव वाघ, तालुका विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविद मापारी, तालुका विद्या प्रसारक मंडळाचे सचिव शंकरराव नळकांडे, औरंगाबादचे माजी महापौर घडामोडे, हेडगेवार पतसंस्थेचे संचालक शामजी मापारी, कैलास करंडे, प्रवीण मापारी, नंदा नळकांडे, गणेश परदेशी अँड.संजीव शिंदे, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य संपर्क प्रमुख निरंजन डहाळे,भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, व्यापारी मनोज डहाळे,विलास गुजराथी,रोखपाल कावेरी नाबदे,मनोज देव,अशोक केणे,गोपाल बडवे,राजेंद्र मापारी उपस्थित होते.डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे संचालक शाम मापारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments