आदर्शगाव गावडेवाडीला तब्बल चौथ्यांदा विमाग्राम पुरस्कार


पारगाव शिंगवे : 

भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आदर्श विमा ग्राम पुरस्काराचे मानकरी आदर्श गाव गावडेवाडीच
सातत्याने चार वर्षे या पुरस्काराचे मानकरी आदर्श गावडेवाडी हेच होत असल्याने सर्वत्र गावाचे कौतुक होताना दिसत आहे. सतत चार वर्षे या गावाला एक लाखाचे बक्षीस मिळत आहे. त्याचा गावाच्या नावलौकिकात मोठा वाट असल्याचे पहायला मिळत आहे परंतु या गावाला सतत पुरस्कार मिळवून देण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा गावडेवाडी गावातील समाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र रामदास गावडे यांनी आपल्या गावाला चार वेळा विमा ग्राम बनवून महाराष्ट्रात महत्त्वाचे स्थान निर्माण करून दिले. संपूर्ण पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होतांना दिसत आहे ,हया पुरस्काराचे वितरण आज गावडेवाडी या ठिकाणी करण्यात आले यावेळी विमा कंपनीतील भारतीय आर्यविमा महामंडळ विकास अधिकारी सचिन भोसले ,तसेच शाखा अधिकारी मा .बाळासाहेब हुले , विष्णू काका हिंगे  कात्रज दुध संघ अध्यक्ष ,निलेश थोरात माजी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ग्रामविमा पुरस्काराची एक लाख रुपयांचा धनादेश गावच्या सरपंच सौ स्वरूपा ऋषिकेश गावडे तसे उपसरपंच ,व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कडे देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ देवराम गावडे तंटामुक्त अध्यक्ष ,हनुमंत गावडे ,किरण गावडे ,रविंद्र गावडे ,ह भ प दिनानाथ महाराज शिंदे ,शिवाजी गावडे ,ऋषिकेश गावडे ,जयवंत गावडे ,बाळासाहेब चिमाजी गावडे ,अनेक ग्रामस्थ हयावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या