तळेगाव ढमढेरे : प्रतिनिधी:
निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे कृषी विभागाच्या वतीने जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना काही औषधे व साहित्यांचे वाटप करून माती व शेती विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी सिद्देश ढवळे यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन करून मातीचे महत्व, सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट, गांडूळ खताचा वापर, पाचट कुट्टी व्यवस्थापन, अवेळी पावसामुळे पिकांवर होणारे परिणाम इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच व्याख्याते योगेश भोसले यांनीही शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादनात कशा प्रकारे वाढ करावी व माती परीक्षणाचे फायदे इत्यादी विषयावरती शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या उपसरपंच तनुजा विधाटे, ग्रा.पं.सदस्य बापूसाहेब काळे, कविता रणसिंग, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडल कृषी अधिकारी अशोक जाधव, कृषी सहाय्यक जयश्री रासकर, हरिता कंपनीचे अनिकेत अडसुळ, राहुल चव्हाण, विजय विधाटे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक जयश्री रासकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे यांनी तर राजेंद्र विधाटे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या