वीज वितरण विरोधात शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन


दौंड :

 शेतकरी शेत पंपाची बिल वीजवितरणला देणे लागत नाही. हे पुराव्याने सिद्ध केले आहे, तरीही वीजवितरण मनमानी करीत असल्याने अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याचे राजाभाऊ कदम यांनी जाहीर केले आहे.

राजाभाऊ कदम हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी देऊळगाव राजे येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

कदम पुढे म्हणाले, विजवीतरणने शेतकऱयाकडे शेती पँपाची वीज बिल थकीत असल्याचे दाखवीत कनेक्शन मनमानी पणे तोडली आहेत. शेतकरी आधीच अंत्यत अडचणीत आहेत. वीज वितरण शेतकरी यांचेकडे खोटी थकबाकी दाखवीत आहे. परंतु शेतकरी विजवीतरणच काहीही देणे लागत नसून उलट वीजवितरण शेतकरी वर्गाचे देणे लागत आहे. हे  पुराव्याने कागद पत्रे दाखवून सिद्ध केले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पुढारी याबाबत मूग गिळून गप्प आहेत, त्यांनाही जाब विचारला पाहिजे. शेतकरी वर्गाने या कठिण प्रसंगी एकत्र  आंदोलनात सहभागी व्हावे, व आंदोलन यशस्वी जरण्यास सहकार्य करून आपला प्रश्न सोडवण्याचे करावे, असे आवाहनही कदम यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या