चांगदेवनगर येथे वाहतूक कोंडी : वाहन चालक त्रस्त


पुणतांबा ( प्रतिनिधी )

रेल्वे खात्याने रेल्वेच्या कामाकरिता पुणतांबा येथील स्टेशनरोड वरील रेल्वे फाटक 30 नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सध्यांकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवले होते. ह्यावेळी पुणतांबा मार्गे कोपरगाव श्रीरामपूर तसेच वैजापूरकडे जाणारी सर्व वाहतूक चांगदेव नगर मार्गे वळविण्यात आली होती. मात्र आशाकेंद्र चौकापासून चांगदेव नगर कडे येणारा अरुंद रस्ता व चांगदेवनगर रेल्वे चौकीजवळचा भुयारी मार्ग तसेच चांगदेवनगर ते गणपती फाट्या पर्यंतचा एकेरी रस्ता ह्यामुळे गेल्या दोन दिवसापासून ह्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

विशेषतः १२ तसेच १६ टायर असलेल्या मोठ्या अवजड वाहनांच्या ट्रकमुळे हमखास पणे वाहतूक कोंडी होत होती. एक तर ह्या ट्रकना चांगदेवनगर येथ रेल्वेच्या भुयारी पुला खालून जाण्यासाठी सहज वळण घेता येत नव्हते, ट्रक मागे पुढे घेऊन भुयारी पूलाखालून अनेक प्रयत्न केल्यानंतर जात होती. त्यात श्रीरामपूरकडे जातांना तसेच श्रीरामपूर हून पुणतांब्याकडे येतांना गणपती फाटा ते चांगदेवनगर ह्या एकेरी रस्त्यात्यामुळे मोटार सायकल आली तरी मोठ्या वाहनांना थांबावे लागत होते. चार चाकी वाहन समोरून आले तर वाहने काढणे जिकीरीचे होत होते. अनेकांना मोठी कसरत करावी लागत होती. यावेळी वाहतूक कोंडी होऊन वादावादीचे प्रकार होत होते. भविष्यात असे होऊ नये म्हणून आशा केंद्र चौक ते चांगदेवनगर तसेच गणपती फाट्या पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण सार्वजानिक बांधकाम खात्याने तातडीने करण्याची मागणी वाहन चालकाकडून केली जात होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या