नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : डॉ. संजय चाकणे

 


इंदापूर : 


विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आधुनिक कौशल्य देखील आपल्या अंगी बाळगायला हवीत, त्याचबरोबर त्यांनी शेअर बाजार, व्यावसायिकता, आर्थिक साक्षरता या क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी केले. 
ते इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचे मानवी जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना पटवून देताना अर्थशास्त्र विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर इतर कौशल्य देखील आत्मसात केली पाहिजेत असे मत व्यक्त केले. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या विधान गाथा या पुस्तकाचा उल्लेख करून ते वाचण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

याप्रसंगी डॉ. तानाजी कसबे, डॉ. गजानन कदम, डॉ. दिगंबर बिराजदार, प्रा. अमोल सरडे, प्रा.अक्काबाई श्रीराम, प्रा.थोरात आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
 
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. भिमाजी भोर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती चव्हाण या विद्यार्थिनीने केले तर आभार अजिनाथ चोरमले या विद्यार्थ्याने मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या