ताबा सुटल्याने कार पुलाच्या खाली कोसळली


प्रतिनिधी : निरगुडसर

कळंब गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे रस्त्यावर पहाटे साडे चार ते पाच वाजल्याच्या सुमारास गाडी वरून चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात कार दुभाजकाला धडकून पुलाखाली पडली असल्याची घटना घडली आहे. या अपघातात गाडीचा चालक व गाडीतील प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजत आहे.
याबाबत अधिक मिळालेल्या माहिती नुसार नाशिक वरून पुणे बाजूकडे जाणारी एम एच १४ जे. ई.१२९९ ही वेगनर गाडी पुण्याला जात असताना मंचर गावच्या हद्दीत सहाणे मळा येथे चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ती दुभाजकाला धडकून पुलाखाली गेली आहे. या अपघातात वाहन चालक किरण वारे व इतर चार प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या