आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरूनाशिकः राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या फेलोशिप, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2022 करिता केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया होत आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना 30 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत

वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, तत्सम विद्याशाखेचे फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच सर्टीफिकेट कोर्स इन इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टीफिकेट कोर्स इन ऑपरेशन थेअटर टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन टेक्नीशियन, रेस्पायरेटरी थेरपिस्ट इन इंटेन्सिव्ह केअर, सर्टीफिकेट कोर्स इन क्रिटीकल केअर डायलासिस, सर्टीफिकेट कोर्स फॉर टेक्निशियन इन पल्मनरी फंक्शन टेस्ट, सर्टीफिकेट कोर्स इन ई.सी.जी. टेक्नीशियन असिस्टन्ट, सर्टीफिकेट कोर्स इन पंचकर्म थेरपिस्ट, सर्टीफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टीफिकेट कोर्स फॉर क्लिनिकल इन मेडिको लिगल प्रॅक्टीस, सर्टीफिकेट कोर्स इन होमिओपॅथी फार्मसी, सर्टीफिकेट कोर्स इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियाबाबत अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालक, विद्यार्थ्यांनी 0253-2539156 किंवा 0253-2539197 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या