भिमथडीत साकारली पर्यावरण पूरक शाश्वत सोसायटी


पुणे:


बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व  शारदा महिला संघाच्या माध्यमातून  22 डिसेंबर पासून सुरू झालेली भीमथडी जत्रा खऱ्या अर्थाने आपले वेगळेपण जपत आहे. 
"सोसायटीने स्वतःसाठीचे  स्वतः पिकवायचे आणि संपूर्ण सोसायटीच्या गरजा भागवायच्या" ही मुळ संकल्पना घेऊन या वर्षीची भीमथडी पुण्यात आली आहे.
शहरी वातावरणात देखील 40 / 50  घरांच्या छोट्या छोट्या सोसायट्या  संपूर्ण सोसायटीला लागेल एवढ्या पालेभाज्या, फळ भाझ्या व आवश्यक तो माल पिकवू शकतात हे या समृद्ध व शाश्वत सोसायटीने दाखवून दिले आहे.
या मध्ये कचरा व्यावस्थापन, सौर व पवन ऊर्जा, पाणी व्यावस्थापन ,बायोगॅस, सेंद्रिय शेती, गोठा, शेततळे व मधमाशी पेटी अत्यंत खुबीने वापरले आहे. तसेच टेरेस व किचन गार्डन,रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार सिस्टम आशी विविधांगी समृद्ध व शाश्वत गाव संकल्पना आहे.  शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेले हे मॉडेल पुणेकारांनी आवर्जून बघावे असे आयोजकांतर्फे आवाहन आहे.

पर्यावरणीय दृष्टीने आपण सर्वच जागरूक झाले असताना भीमथडीतही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. देशी गायीच्या शेणापासून बनविलेले  100 टक्के नैसर्गिक , पर्यावरण पूरक गोमाय दिवे व शेणाच्या गणपती मूर्ती हे वर्षीचे आकर्षण ठरत आहे. सकारात्मक ऊर्जा, वातावरणात प्रसन्नता व झाडांसाठी खत म्हणून याचा वापर होतो. 
त्याच बरोबर पुणेकर नागरिकांसाठी  अमृतरस हे आरोग्य वर्धक व आरोग्य संवर्धक पेय उपलब्ध करून दिले आहे. 

या वर्षीच्या भीमथडीत नेहमीच्या उत्पादनाबरोबर  शेंगदाणा गुळपट्टी, खोबरे गुळपट्टी, तीळ गुळपट्टी व जवस गुळपट्टी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. आयुर्वेदात जवस या पदार्थाला अनन्य साधारण महत्व असून  शरीराला पोषक, हाडे व सांधे मजबूत करणे, अर्धांगवायू, वातविकार पोटाचे विकार व लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करण्यात जवस महत्वाचा आहे. शरीरातील आवश्यक ती उष्णता राखली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या