शिवजन्मभूमी ते गेट वे ऑफ इंडिया सायकलस्वारी पूर्ण


ओतूर : 


जुन्नर तालुक्यातील १३ सायकल स्वारांनी शिवजन्मभूमी ते गेट वे ऑफ इंडिया सायकल स्वारी पहिल्यांदाच अवघ्या नऊ तासात पूर्ण केली.
ओतूर येथील नगर वेशीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सायकल राईडला आयर्न मॅन डॉ.अमोल डुंबरे यांनी झेंडा फडकवून सुरूवात झाली.
नगर कल्याण महामार्गाने माळशेज घाटातून स्वारी कल्याण नंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने गेटवे ऑफ इंडिया येथे दाखल झाली.प्रत्येक ३० कि.मी.वर १० मिनिटांची विश्रांती घेत सर्व सायकल स्वारांनी २०० कि.मी.चे अंतर पार पाडले.
"सायकल चालवा, तंदुरूस्त रहा, प्रदुषण टाळा" हा संदेश घेऊन ही सर्व टीम ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा झाली ती शिवजन्मभूमी ते महाराष्ट्राची व देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशी सायकल स्वारी पूर्ण केली.
गेटवे ऑफ इंडियाला यशस्वीरित्या पोहचल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांनी सर्वांचे स्वागत करून प्रत्येक सायकल स्वाराचा शाल घालून सत्कार केला. यावेळी आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्व सायकल स्वारांशी संवाद साधून विशेष कौतुक केले.

सायकल स्वारीमध्ये जयसिंग डुंबरे, संतोष डुंबरे,बबलू हिंगणे,रविंद्र डुंबरे,भाऊसाहेब मुरादे, मारुती गाडगे, महेश घोलप,अनिकेत जाधव, सत्यवान थोरात, सुधाकर लोंढे,रोहित बारसोडे, संजय मुरादे, ॲड.जयदीप डुंबरे सहभागी झाले होते.

धनंजय माताडे, सुनिल इचके व सर्व टीमच्या वतीने सहभागी प्रत्येक सायकल स्वराला टी शर्ट देण्यात आले.
ओतूर सायकल ग्रुपने स्वारीचे यशस्वी नियोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या