विरोधकांच्या सहकार्याने बिनविरोध निवड : थोरात


दौंड :


 मी पुणे जिल्हा बँकेत राजकारण करीत नाही, हे सर्वांना माहीत आहे. यामुळेच विरोधकांनीही राजकारण न करता मला बिनविरोध निवडण्यास मोलाचे सहकार्य केले आहे. असे मत रमेश थोरात यांनी व्यक्त  केले आहे.
पुणे जिल्हा  बँकेवर सलग आठव्यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलेले माजी आमदार रमेश थोरात यांचा सत्कार प्रसंगी थोरात बोलत होते.
दौंड शहर आणि तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दौंड येथे थोरात यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांचे हस्ते थोरात यांचा फेटा, शाल ,श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी राज्य महिला सरचिट निस वैशाली नागवडे, दौंडनगर पालिक उपनगराध्यक्ष संजय चितारे, विरोधी गट नेते बादशहाभाई शेख, जि,प. सदस्य  बाबा जगदाळे, ऍड, अजित बलदो टा,  राजेश जाधव, वसीम शेख ,प्रवीण परदेशी, प्रशांत धनवे, अजय राउंत या मनावर यांचेसह विविध संस्थांच पदाधिकारी  कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात थोरात पुढे म्हणाले, आम्ही जिल्हा बँकेत चुकीच काम कधीही करीत नाही, यामुळे आज बँक रात्यातच नव्हे तर देशात अग्रगण्य मानली जात आहे, सध्या बँकेने 8500  कोटी रुपये कर्ज शेतकऱ्यांना दिले असून या पैकी दौड तालुक्याला 1900 कोटी कर्ज दिले आहे.
या वेळी मी बिनविरोध निवडून येण्यासाठी भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे,
रमेश थोरात प्रथम 1985 साली जिल्हा बँकेवर निवडून आले, यावेळी ते आठव्यांदा सलग बिनविरोध निवडून आले असून ते सात वर्षे बँकेचे अध्यक्ष होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या