भारतीय जनता पक्षाने पडळकरांना आवरलं पाहिजे – हसन मुश्रीफकोल्हापूर : भाजपने गोपीचंद पडळकर यांना आवरले पाहिजे, अशा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही, अशी टीका मुश्रीफ यांनी पडळकरांवर केली आहे. तसेच पडळकरांनी बोलताना भान राखण्याची गरज आहे. अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली आहे हे भाजप ने ओळखण्याची गरज आहे, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर मुश्रीफांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या