ताबा सुटल्याने उसाची ट्रॉली उलटली


मांडवगण फराटा :


न्हावरे(ता.शिरूर)येथे जिल्हा बॕकेच्या जवळ  शिरूर सातारा या राज्यमहामार्गावर ट्रॕक्टरवरील ताबा सुटल्याने दोन उसाने भरलेल्या ट्रॉली  उलटल्याची घटना घडली आहे.दरम्यान या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.अपघात झालेल्या ठिकाणी रस्ता हा अरूंद असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.काही दिवसांपुर्वी  जिल्हा बॕकेच्या एका शिपायाचा याच ठिकाणी रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता.याच रस्त्यावर दोन महिन्यापुर्वी अपघातात एक शाळकरी मुलगा जखमी झाला होता.सध्या येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून रस्तावरुन  मोठ्या प्रमाणात वाहतूक  होत असल्याने व रस्ता अरुंद असल्याने कायम अपघात होत आहे .आतापर्यंत या रस्त्यावर छोटेमोठे अपघात झाले असुन अनेकांचे मृत्यू झाले आहेत तर काहीना अपंगत्व आले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जिवीतहानी होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल या परिसरातील नागरिकांनी व्यक्त करत आहे. या ठिकाणी संबंधित खात्याने त्वरित रस्त्याचे काम करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या