रेशनचा माल खुल्या बाजारात विकणार्‍या दोघांवर गुन्हा

१ लाख ७८ हजार ७५० चा मुद्देमाल हस्तगत बारामती 

बारामती शहरामध्ये गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात विकणाऱ्या मोहन शंकर रणदिवे (नीरा-बारामती रोड,नंदन पेट्रोल पंपसमोर ) व वाहनचालक सोमनाथ रामचंद्र भापकर दनाने ( रा.सटवाजीनगर,बारामती ) या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी त्याच्या ताब्यातील गाडीसह २५ पोती तांदूळ असा तब्बल १ लाख ७८ हजार ७५० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानात गरजूंना वितरित होणारा तांदूळ हा सदर संशयित आरोपींनी खरेदी करून तो खुल्या बाजारात चढया भावाने विक्रीकरिता खाजगी पोत्यामध्ये भरून विनापरवाना मालवाहतूक गाडी क्र. (MH.४२ AQ ३६०३) गाडीमध्ये रेशनिंगचे मालाची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करण्याचे उदेशाने घेवून जात असल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. या वाहनात एकूण २५ पिशव्या तांदूळ आढळून आला. या वाहनाचा वाहन चालक सोमनाथ भापकर यांच्याकडे विचारणा केली असता या पिशव्यांमध्ये तांदूळ असून तो मोहन रणदिवे यांच्या दुकानातील असून, तो बारामती मार्केट यार्ड या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी रणदिवे यांनी सांगितले असल्याचे चालकाने कबूल केले. यामध्ये तांदूळाने भरलेली खाकी रंगाची सरकारी शिक्का असलेली पोती,तसेच मालवाहतूक करणारी फिक्कट पिवळया रंगाची गाडी असा एकूण १ लाख ७८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस,पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक खांडेकर, पोलीस नाईक, तुषार चव्हाण,पवार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या