Breaking News

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर खराब अन् बिनकामाचे - विनायक राऊत

 नवी दिल्लीः कोविड महामारी सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच कोविड परिस्थितीवर लोकसभेत चर्चा होत आहे. विषयाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊतयांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आणि आरोप केला केला की महाराष्ट्राला एकूण पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 60 टक्के व्हेंटिलेटर हे खराब होते. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना पीएम केअरअंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले होते. पण महाराष्ट्रात जे हजारो व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होतेस त्यापैकी 60 टक्के व्हेंटिलेटर कामच करत नव्हते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी संसदेत केली आहे.

भारतातील प्राणघातक दुसऱ्या कोविड लाटेत, भारतातील अनेक लोकांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर बेडची अनुपलब्धता यामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र, केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेत भारतात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कधीही मान्य केलेले नाही.


No comments