मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. मी त्यांना अभिवादनही करतो. पण जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर अशा ठिकामी जाऊन काय करायचे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
0 टिप्पण्या