भिमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा पुन्हा जोरात,

पोलीसांकडून कारवाई तर महसुलची डोळेझाकपाटस : 

दौंड तालुक्यातुन गेलेल्या भिमा नदीत मागील कित्येक दिवसांपासून बेकायदा वाळू उपसा बंद असल्याने मोकळा श्वास घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गार, नानवीज, सोनवडी तर पुर्वभागातील मलठण, शिरापुर, वाटलुज, राजेगाव या भागात रात्रीच्या सुमारास यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळु उपसा सुरू आहे. दौंड पोलीसांकडून वाळू वाहतुकीवर कारवाई होते. मात्र महसूल विभागाकडून याप्रकाराकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले 
जात असल्याचे चित्र आहे. 
    तालुक्यात भीमा नदीलगतच्या बहुतांश गावांमध्ये यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा व वाहतूक सुरू असतो. महसुल विभागाकडून कारवाई होत असली तरी या कारवाईला न जुमनता काही दिवसांत लगेच वाळू उपसाच्या बोटी नदीपात्रात सुरू होत असल्याचे चित्र पहावयास मिळायचे. मात्र पोलीसांना बेकायदा वाळू उपसा आणि वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार दिल्यापासून तालुक्यात अनेक ठिकाणी पोलीसांनी बेकायदा वाळू उपसावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईंमुळे मागील कित्येक दिवसांपासून तालुक्यातील भिमा नदी पात्रातील वाळू उपसा व वाहतुक बंद झाल्याचे चित्र होते. मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गार, नानवीज, सोनवडी तर पुर्वभागातील मलठण, शिरापुर, वाटलुज, राजेगाव या भागात रात्रीच्या सुमारास यांत्रिक बोटीच्या व सहाय्याने बेकायदा वाळु उपसा व वाहतुक सुरू आहे. मागील आठवड्यात दौंड पोलीसांनी वाळू वाहतुक करणारा एक ट्रक आणि मलठण परिसरातील भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटीवर कारवाई करण्यात आली होती. 
      दौंड पोलीसांनी कारवाई केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच तालुक्यातील गार,नानवीज,सोनवडी व पुर्वभागात बेकायदा वाळु उपसा व वाहतुक सुरू आहे.रात्रीच्या सुमारास दौंड शहर,दौंडशुगर रोड ते रावणगाव व दौंड पाटस रोड वरून पुणे सोलापुर महामार्गावरून चोरटी वाळू वाहतुक केली जाते. या प्रकाराकडे महसूल विभागाचे तलाठी आणि मंडलाधिकारी यांचे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहेत. तहसीलदार संजय पाटील आणि दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीवर ठोस अशी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या