डायलिसिस सुविधेमुळे गरीब रुग्णांना लाभ होईल : आ. कुल


दौंड :


--- गेली दोनवर्षे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. डांगे आणि त्याचे सर्वच सहकारी यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केले आहे. यापुढे ते डायलिसिस सेवा ही उत्तम देतील, म्हणून येथे डायलिसिस सेवा सुरू केली असे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.
दौंड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच सुरू करण्यात येणाऱ्या डायलिसिस सेवेचा लोकार्पण सोहळा दौंड उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास दौंडचे जेष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, उपनगराध्यक्ष संजय चितारे, नगर सेवक बबलू कांबळे, ऍड, अरुणा डहाळे, डॉ, दीपक जाधव, हरेश खोमणे, सचिन कुलथे,जितू मगर, रामेश्वर मंत्री, गणेश पवार, इकबाल शेख या मान्यवर यांचेसह डॉ, संग्राम डांगे, त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
आमदार कुल यांचे प्रयत्नाने फ्रेंसिनियंम मेडी केअर कंपनीने जागतिक दर्जाचे डायलिसिस मशीन युनिट यामध्ये आरो वॉटर प्लांट, डायलायझर रीप्रोसेस मल्टी पेरा मॉनिटर आदींचा यामध्ये समावेश आहे.
दौंड स्थानिक आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातूनही गेल्या अनेक अनेक वर्षांपासून डायलिसिस सेवेची मागणी ही सातत्याने करण्यात येत होती. याचा विचार करून सन 2018 मध्ये मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टकडे डायलिसिस युनिटची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
मागील दोन वर्षाच्या गंभीर कोरोना काळात कोरोनाला आवश्यक अन्य यंत्रणा निर्माण करणे शक्य झाले नव्हते. परंतु आत्ता कोरोनातून बाहेर पडलया नंतर या युनीटला आवश्यक असणार फिल्टरेशन व इतर सुविधा उपलब्ध करून आज डायलिसिस सेवा लोकार्पण करीत आहोत, असेही कुल यांनी नमूद करून भविष्यातही सर्वसामान्य नागरिक आणि गोर गरीब रुणाच्या आरोग्य सेवेसाठी प्राधान्य देऊन सातत्याने प्रयत्न करीन अशी जाहीर ग्वाही कुल यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या