मजुरीचे दर वाढले तरीही शेतकऱ्यांची पसंती कांद्यालाच


शिंगवे पारगाव आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळीच्या तडाख्यातून वाचलेली कांदा रोपे आता लागवडीसाठी सज्ज झाले आहेत .
शिंगवे पारगाव परिसरात कांदा रोपाच्या लागवडीस प्रारंभ करण्यात आला आहे, मागील तीन ते चार महिन्यापूर्वी कांदा बियाणे वाफा पद्धतीने रोपे तयार करण्यासाठी टाकण्यात आली होती, तेव्हापासून आजतागायत सातत्याने बदलत्या हवामानाने व अवकाळी पावसाने कांदा रोपे व या दरम्यान शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्यास मोठा फटका बसला, महागडी खते औषधे फवारणी करून जोपासलेल्या कांदा रोप आता शेतकरी शेतात लावगड करीत आहे.
 कांदा लागवडीसाठी असलेली मजुरांची टंचाई लागवडीसाठी मजुरी दर जरी जरी वाढलेले असले वाढलेले असले तरी तालुक्यात अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून म्हणून कांदा लागवड करतात आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात शिंगवे पारगाव, लाखणगाव, देवगाव, काठापुर, वळती, भागडी परिसरातील गावात गावांतून मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जात असल्याची माहिती शेतकरी धोंडीभाऊ भोर ,रवि भोर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या