लखीमपूर हिंसेप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - राऊतवी दिल्ली: लखमीपूर हिंसेप्रकरणी आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेचा निषेध म्हणून सर्व विरोधी पक्षाने आज संसदेबाहेर लाँगमार्च काढला. तर, लखमीपूर हिंसेची लढाई संपलेली नाही. ही लढाई सुरूच राहील. याप्रकरणी गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

लखमीपूर हिंसेप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी संसदेबाहेर लाँग मार्च काढला. त्यानंतर विरोधक मीडियाला सामोरे गेले. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संपणार आहे. लखीमपूर खिरीची लढाई अजून संपली नाही. ही लढाई सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिलं आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट आला. तुम्ही एसआयटी स्थापन केली. तुमचीच एसआयटी आहे. तरीही तुम्ही एसआयटीचा रिपोर्ट मानत नाही त्यामागचे कारण काय?, असा सवाल राऊत यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या