खुले बहुभाषिक कवी समेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा


आळंदी : 

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधीने पावन झालेल्या श्री श्रेत्र आळंदी येथील चाकण चौक सारडा धर्मशाळा येथे तेजभुषन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र  यांच्या माध्यमातून रंगीन काव्यधारा साहित्य कलामंच आळंदी शाखा आयोजित खुले बहुभाषिक कवी समेलन तसेच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि कवयित्री तेजस्विनी बि-हाडे संपादित केलेल्या "आवाज स्पंदनातील" या काव्य संग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ भगीरथ, महासचिव भुषण बि-हाडे, कोषाध्यक्ष तेजस्वीनि बि-हाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

या खुले बहुभाषिक कवी संमेलनाचे उद्घाटन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते होणार आहे.
 यावेळी संम्मेलनाध्यक्ष डाॅ.ख.र.मावळे, स्वागताध्यक्ष शकील ताज, जाफरी असणार आहे. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त तुषार सहाने, उद्योगपती निलेश फुंडे, व्याख्याते अमर हजारे,प्रसिद्ध लेखक राजेश दिवटे, ज्येष्ठ साहित्यिक दिपक सपकाळ, दिपक खरात, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, नगरसेवक प्रकाश कु-हाडे, राष्ट्रीय कवी पुरुषोत्तम महाराज हिंगनकर,इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी, कवयित्री,लेखक, साहित्यिक बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या