आघाडीने लोकशाही कुलूप बंद केली - फडणवीस



मुंबईः महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीच कुलूपबंद केली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे, अशा घणाघात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याच्या अधिवेशनात भाजपच्या आमदारांचं संख्याबळ कमी व्हावं, यासाठीच त्यांना वर्षभर सस्पेंड केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय.

भाजपच्या 12 आमदारांना वर्षभर निलंबन कायम ठेवण्याच्या निर्णयाविरोधात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढी कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे



अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. माहराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही सुरू आहे. आणि रोखशाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला थांबवणे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ स्थगिती खंडणी लूट भ्रष्टाचार हे सर्व प्रकार या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. ते कधीच पाहिले नव्हते. विरोधकांनी बोलू नये म्हणून त्यांचं एक वर्षासाठी निलंबित केलं जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अक्षरश काळीमा फासण्याचं काम होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या