राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?; देवेंद्र फडणवीसमुंबई: आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्यानंतर आता म्हाडाची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित आहे की नाही? असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरून हा संताप व्यक्त केला आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आधी आरोग्य भरती परीक्षेचा घोळ झाला. पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत गेले आहेत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे. किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या