माळेगावात रंगला पोलीस-पत्रकार क्रिकेट सामना

पत्रकार संघाची पोलीस संघावर सात गडी राखून मात
बारामती :


 शेवटच्या षटका पर्यंत  रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पत्रकार संघाने पोलीस संघावर सात गडी राखून पराभव केला. सामन्याचा मानकरी म्हणून मनोज पवार यांचा सन्मान करण्यात आला.

     माळेगांव येथे विशाल घोडके, अमोल भोसले, इम्तियाज शेख यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेत पत्रकार व पोलीस संघात मैत्रीपूर्ण लढत (दि:२३) रोजी आयोजित करण्यात आली होती. पोलिस संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
     
  सहा षटकांच्या लढतीत सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे (२५ धावा), पोलीस निरीक्षक महेश ढवाण (२४ धावा) , डि.वाय.एसपी गणेश इंगळे
(७ धावा) यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ३ बाद ५८ धावा केल्या. यावेळी पत्रकार संघाचे संजय वाघमारे यांनी (२बळी), योगेश भोसले यांनी (१ बळी) घेतला.
 
    जिंकण्यासाठी ५९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत पत्रकार संघाने सामनावीर मनोज पवार (३६ धावा) एकट्याच्या जोरावर सदर सामना जिंकला. पत्रकार संघाने ३ बाद ६१ धावा केल्या. यावेळी प्रविण यादव ( ८ धावा ), मयुर भोसले ( ३  धावा) तर पोलीस संघाच्या वतीने काॅन्टेबल बनकर ( २ बळी), डिवायएसपी (१ बळी) यांनी बळी घेतले.
    
  यावेळी माजी उपसरपंच शिवराज राजेजाधवराव यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी किरण तावरे, सुयोग सातपुते, पत्रकार विजय भोसले, संदिप आढाव, प्रणव तावरे, पोलीस कर्मचारी प्रशांत राऊत, दीपक दडस, नितीन कांबळे, तुषार लोंढे उपस्थित होते. या सामन्याचे समालोचन पत्रकार प्रा.अनिल धुमाळ यांनी केले. सामन्यांत अंपायर म्हणून शरद पवार व विशाल घोडके यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या