नाशिकः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले. नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत. केवळ एका बोलघेवड्या मंत्र्यामुळे ओबीसी आरक्षण गेले, असा हल्लाबोल बुधवारी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. राज्यातले महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचे आणि अपशकुनी आहे. हे सरकार कोणत्या मुहूर्तावर आले माहित नाही. मात्र, यामुळे लोक देशोधडीला लागले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
0 टिप्पण्या