एसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं? चंद्रकांत पाटील
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परखड मत व्यक्त करत सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्टपूर्ण होणार नसल्याचे नुकतेच अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र अजित पवार दादागिरीने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न रेटण्याचा प्रयत्न करतायत,पण तसं चालत नाही. परखड मतांने सर्वच कामे होत नाहीत असा टोलाही पाटील यांनी पवार यांना लगावला आहे. एसटी विलीनीकरण शक्य नसेल तर आश्वासन का दिलं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

अटलजींची जयंती आहे आम्ही दीड लाख घरापर्यंत जाणार आहोत. मोदींच्या योजना प्रत्येक घरात सांगणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अजित पवारांचा परखड पणा सगळीकडे चालणार नाही. विलीनीकरण का होणार नाही ते सांगावं, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष न्यावं लागणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या