गुजर प्रशालेत सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


तळेगाव ढमढेरे  : 


तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत बुधवार (दि. १५) रोजी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. 
   या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले होते. कार्यक्रमाची अध्यक्ष निवड प्रशालेची विद्यार्थीनी तृप्ती चौधरी हिने केली तर अनुमोदन मनीष नांदखीले या विद्यार्थ्याने दिले.यावेळी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात पाळावयाचे नियम व घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 
यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहावीची विद्यार्थिनी निर्मय गोसावी हिने केले तर आभार कृष्णाली गडाख हिने मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या