डॉ.मिलिंद महाराज भोसुरे यांच्या ५ व्या नवीन " शब्दगंध " या पुस्तक प्रकाशना


पुणे :


  स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य डॉ.मिलिंद महाराज भोसुरे यांच्या ५ व्या नवीन " शब्दगंध " या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम येरवडा (पुणे) साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे मंगळवारी (ता.२१) संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोली ए पुनावाला स्कूल, हडपसर चे संस्थापक अध्यक्ष बी. एन. आदमाने, उद्योजक बिपीन घोरपडे, रोटरी क्लब पुणे नगर रोडचे अध्यक्ष  गीताराम कदम , सेक्रेटरी तुकाराम डफळ, राजेंद्र दणके, नवनाथ निचीत, माला देवी इ. व सर्व पदाधिकारी तसेच स्वरूप संप्रदायातील पुस्तक प्रकाशक ललिता अतुल नवले व सर्व शिष्यगण या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याप्रसंगी डॉ. मिलिंद महाराज यांनी पुस्तकाचे महत्त्व व सामाजिक कार्याची जाणीव किती महत्वाची असते हे नमूद केले. तसेच अध्यक्ष आदमाने यांनी सुध्दा त्यांच्या शाळेच्या ५० वर्षांचा प्रवास व सामाजिक तळमळ महत्व, तसेच स्वरूप संप्रदायाच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या